मुंबई

कोकणनगरमधील कचऱ्याचा प्रश्न अखेर मार्गी

CD

कोकणनगरमधील कचऱ्याचा प्रश्न अखेर मार्गी
दुर्गंधी, अस्वच्छतेच्या समस्येवर पालिकेकडून त्वरित उपाययोजना
जोगेश्वरी, ता. २२ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्व येथील कोकणनगर परिसरातील वळणाजवळील कचराकुंडी भरून वाहत असल्याने निर्माण झालेल्या दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या समस्येची ‘सकाळ’ने दखल घेतल्यानंतर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तत्काळ कारवाई केली आहे. संबंधित ठिकाणी साचलेला कचरा उचलून परिसराची स्वच्छता करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोकणनगर परिसरातील कचराकुंडी पूर्णपणे भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर पसरला होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता, तसेच परिसरात तीव्र दुर्गंधी पसरून नागरिकांचे हाल होत होते. पालिकेकडून नियमित कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत होते. याशिवाय कचरा वेचणाऱ्या काही व्यक्तींमुळे कचरा अधिक विखुरला जात असल्याने अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली होती.
कचराकुंडीसमोरच पालिकेचे उद्यान असल्याने येथे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे या अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात ‘सकाळ’च्‍या १७ जूनच्‍या अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत के-पूर्व विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तातडीने कारवाई करून कचरा उचलला व परिसर स्वच्छ केला. समस्या मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी ‘सकाळ’चे तसेच पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियमित स्वच्छता आणि वेळेवर कचरा उचलण्याची व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

Crime News: कोर्याची सीमा! मामानं ९ महिन्यांच्या भाचीला घरातून उचलून नेलं, नंतर घडवलं घृणास्पद कृत्य; शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आढळली

Latest Marathi News Live Update : कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट

बाप-लेकीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी! 'फादर्स डे'ला रिलीज झाला 'द्विधा' चित्रपटाचा टिझर; 'या' दिवशी येणार भेटीला!

SCROLL FOR NEXT