मुंबई

मराडेपाडा येथे २६-२७ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा

CD

भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : तालुक्यातील मराडेपाडा येथील शिवक्षेत्र छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठात शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने २६ व २७ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा होणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त डॉ. राजू (भाऊ) चौधरी यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, शांताराम मोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विश्वास थळे, भिवंडी महापालिकेचे महापौर नारायण चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या सोहळ्यात शिवराज्याभिषेक विधी, पालखी सोहळा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव, शिवतुलादान, देवीचा गोंधळ, महाआरती, पोवाडे, भजन, कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे राष्ट्रकार्य आणि हिंदवी स्वराज्याचा वैभवशाली इतिहास जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्यभरातील शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राजू चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT