नाल्याचे काम रखडल्याने नामदेवनगरातील रहिवासी धास्तावले
वाशी, ता. २२ (बातमीदार) ः दिघ्यातील संजय गांधीनगर व नामदेवनगर परिसरातून वाहणारा मुख्य नाला अद्याप काही ठिकाणी कच्च्या स्वरूपातच असल्याने, पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरातील अनेक घरांची उंची नाल्याच्या काठावरील उंचीपेक्षा कमी असून काही ठिकाणी नाल्याची तळपातळी व घरांची तळपातळी जवळपास समान असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता अधिक आहे. अतिवृष्टीच्या काळात डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात येणारे पावसाचे पाणी या नाल्यातून वाहून जाते. मात्र, रेल्वे पुलाखालील अरुंद जलवाहिनी तसेच रेल्वे पुलापासून ऐरोली नॉलेज पार्कपर्यंतचा नाला अद्याप पूर्णपणे आरसीसी न झाल्याने पाण्याचा निचरा अपेक्षित वेगाने होत नाही. त्यामुळे नाल्यातील पाणी साचून त्याची पातळी वाढण्याचा धोका निर्माण होतो. उच्च भरतीच्या वेळी खाडीमार्गे होणाऱ्या पाण्याच्या प्रतिप्रवाहाचा नाल्याच्या निचऱ्यावर परिणाम होतो. त्यामुळे नाल्यालगतच्या गटारांमध्ये उलटा प्रवाह निर्माण होऊन पाणी परत गटारांमध्ये शिरते. या परिस्थितीत गटारांच्या माध्यमातून परिसरातील घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.