वज्रेश्वरी, ता. २२ (बातमीदार) : येथील श्रीमती दुर्गादेवी कुमार महिला महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य वास्तूमुळे परिसरातील, विशेषतः आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असल्याने हा सोहळा शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला.
उद्योजक सुरेशकुमार यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ उभारलेली ही इमारत मुलींच्या उच्च शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरेल. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये सामाजिक, राजकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन त्या संशोधन, अर्थकारण तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास खासदार चतुर्वेदी यांनी व्यक्त केला. या वेळी नूतन इमारतीचे दाते सुरेशकुमार यांनी, आईच्या शिक्षणाविषयी असलेल्या अपार आस्थेतून प्रेरणा घेऊन ही वास्तू उभारल्याचे सांगितले. समाजातील मुलींना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे हा या योगदानामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्या वास्तूमुळे वज्रेश्वरी परिसरातील महिला शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थिनींसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधांचे नवे दालन खुले झाले आहे. शिक्षणाच्या बळावर ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. विजय जाधव होते. संस्थेचे सरचिटणीस ॲड. रोहित विजय जाधव यांनी उपस्थित मान्यवर, पाहुणे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. सोहळ्यास उद्योगपती ओमप्रकाश टिकिय, प्रेम कमल, दीपन रेहान, पूनम झावर, विकास पाटोळे, उषा सलोजी, प्रदीप सोनवणे, सुनीता कुमार, संस्थेचे कार्याध्यक्ष बी. डी. काळे, उपाध्यक्ष अरुणा जाधव, श्रीराम भोईर, जी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. शशिकांत म्हाळुंकर, विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, पालक तसेच परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.