ग/उत्तर विभाग कार्यालयातील उपाहारगृहाला कुलूप
कर्मचारी, नागरिकांची गैरसोय
संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
धारावी, ता. २२ : पालिकेच्या मुंबईतील सर्व विभाग कार्यालयात कर्मचारी व अभ्यागात्यांसाठी खानपान सेवा मिळावी, यासाठी उपाहारगृहाची सोय केलेली आहे. मात्र, दादर येथील ग/उत्तर विभाग कार्यालयातील चालू असलेले उपहारगृह गेल्या अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी व कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या लोकांना बाहेरील हॉटेल अथवा रस्त्यावरील स्टॉलवर धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
ग/उत्तर कार्यालयात धारावी, माहीम, माटुंगा, दादर या विभागातील हजारो लोक दररोज विविध कामांसाठी येत असतात. तसेच कार्यालयात शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांसाठी कार्यालयाच्या तळमजल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून उपाहारगृह चालवण्यात येत होते. मात्र, अनेक महिन्यांपासून हे उपाहारगृह अचानकपणे बंद करण्यात आल्याने कर्मचारी व कार्यालयात येणाऱ्या लोकांची अडचण होत आहे.
नफ्यात चालणारे उपाहारगृह का बंद केले आहे, असा सवाल निर्माण झाला आहे. कार्यालयाच्या तळमजल्यावर दिशादर्शक फलकांमध्ये उपाहारगृह असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जण त्या दिशेला जातात. मात्र, उपाहारगृह बंद असल्याचे दिसताच त्यांचा भ्रमनिरास होत आहे.
विभाग कार्यालयात येणाऱ्या गोरगरीब व गरजू लोकांची हे उपाहारगृह म्हणजे बजेटमध्ये खाण्यापिण्याची सोय असलेले ठिकाण होते. त्याचसोबत स्वच्छ व चांगले खाद्यपदार्थ या ठिकाणी मिळत असल्याने उपाहारगृहात सतत वर्दळ असायची. हे उपाहारगृह लवकरात-लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात पालिकेच्या ग/उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्या कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, देखभाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्रोटक माहिती दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून ग/उत्तर विभाग कार्यालयातील उपाहारगृह बंद आहे. याबाबतची माहिती घेऊन उपाहारगृह सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो.
- यशवंत किल्लेदार, प्रभाग समिती अध्यक्ष
निविदेची प्रक्रिया सुरू
निविदेची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाली की, उपाहारगृह पुन्हा सुरू होईल. मात्र, सुरू होण्याचा कालावधी आत्ताच सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दुरुस्ती व देखभाल विभागाचे सहाय्यक अभियंता धैर्यशील पवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.