मुंबई

अशाेक विद्यालयात आराेग्याचा जागर!

CD

कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतेवेळी शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, निरोगी आरोग्य महत्त्वाचे आहे. पैशाने आपण कितीही श्रीमंत असलो; परंतु एखाद्या आजाराने ग्रासले तर त्याचा शरीरावर परिणाम होतो म्हणून योगा व व्यायामाचे सातत्य जरुरीचे आहे. पैशांची श्रीमंती कामाची नाही निरोगी आरोग्य महत्त्वाचे आहे. पतंजली योग विद्यापीठाचे योगशिक्षक कविता मोरया यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली त्यांना त्यांचे सहकारी योगशिक्षक संतोष इस्मल, गीता डेकाटे, अर्चना शाहू, प्रीती गुप्ता व नितीन मोडवे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही योगासने केली. कार्यक्रमाचे गणेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्राथमिक मुख्याध्यापक संतोष कदम यांनी आभार मानले.

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

Loni Kalbhor Crime: कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार लोणी काळभोरमध्ये पोलिसांच्या सापळ्यात

SCROLL FOR NEXT