प्रवेशोत्सवासह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पाठ्यपुस्तक वाटपासह शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः आयईएस दिगंबर पाटकर विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव तसेच माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आयोजित विद्यार्थी कौतुक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
प्रवेशोत्सवानिमित्त शाळेची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांच्या माळा, फुगे आणि स्वागत फलकांच्या साक्षीने नवीन विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका कांचन सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय संस्कृतीतील गुरूजनांप्रती आदर व्यक्त करण्याच्या भावनेतून विद्यार्थ्यांनी शाळेच्या पायरीला नमस्कार करून आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि वह्यांचे वितरण करण्यात आले.
याच दिवशी विद्यालयाच्या उल्लेखनीय शैक्षणिक यशानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून विद्यार्थी कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. २०२५-२६ च्या शालांत परीक्षेत विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. तसेच इयत्ता पाचवी, सातवी आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, एनएमएमएस, इन्स्पायर अवॉर्ड तसेच एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांचा गौरव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.