मुंबई

श्रीवर्धन बसस्थानकात ''हिरकणी कक्ष'' सुरू

CD

श्रीवर्धन बस स्थानकात ''हिरकणी कक्ष'' सुरू
स्तनदा माता व बालकांसाठी सुरक्षित, सुसज्ज सुविधेची निर्मिती
श्रीवर्धन, ता. २२ (वार्ताहर) : महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत उपलब्ध तीन टक्के निधीतून श्रीवर्धन बस स्थानकात स्तनदा माता व बालकांसाठी सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ सुरू करण्यात आला आहे.
तालुक्याचे केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय असल्याने दररोज अनेक महिला तान्ह्या बाळांसह श्रीवर्धन येथे येतात. प्रवासादरम्यान किंवा शासकीय कामकाजासाठी आलेल्या महिलांना स्तनपान व बालसंगोपनासाठी सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
कक्षात आरामदायी आसनव्यवस्था, बाळांसाठी पाळणा, खेळणी, दूरचित्रवाणी संच तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. बालसंगोपन व आरोग्यविषयक जनजागृती करणारे माहितीफलकही लावण्यात आले आहेत. कक्षाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने महिलांच्या सुरक्षिततेला अधिक बळ मिळाले आहे.
या सुविधेमुळे स्तनदा माता व बालकांना प्रवासादरम्यान सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि आरामदायी वातावरण उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court Hearing: ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT