मुंबई

जिल्हा कारागृह येथे योग दिन उत्साहात

CD

जिल्हा कारागृह येथे योग दिन उत्साहात
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) : जिल्हा कारागृह प्रशासन व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेमार्फत रविवारी (ता. २१) अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला.
योगदिनानिमित्त संस्थेच्या अध्यक्ष उज्वला चंदनशिव, योगशिक्षक ममता म्हात्रे व उत्कर्षा गुरव यांनी विविध योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मानसिक आणि शारिरिक संतुलन कसे राखले जाते, तसेच योगाभ्यासातून बौद्धिक पातळी कशी सुधारते, आपण आपल्या भावना स्थिर व एकाग्र कशा ठेवू शकतो याबाबत महत्त्व विशद केले.
या जागतिक योग दिन कार्यक्रमात अलिबाग जिल्हा कारागृहातील ११ महिला बंदी व ३६ पुरुष बंद्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल यांनी बंद्यांना नियमित योगा करण्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी सुभेदार देवलु मुकुंद रांजड, महिला शिपाई रामेश्वरी ढाळगे, कारागृह शिपाई महाबिर जगताप, नरसु कोळी, बाबासाहेव वाणी, अजय जावळे यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

Loni Kalbhor Crime: कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार लोणी काळभोरमध्ये पोलिसांच्या सापळ्यात

SCROLL FOR NEXT