मुंबई

‘झुलेलाल चौक’ फलकावरून घाटकोपरमध्ये नवा वाद

CD

‘झुलेलाल चौक’ फलकावरून घाटकोपरमध्ये नवा वाद
महापौरांच्या नावाविना उद्‍घाटन फलक; विरोधकांचा सवाल
घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) : घाटकोपर पूर्वेकडील विक्रांत जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या ‘झुलेलाल चौक’ शिल्पाच्या उद्‍घाटनानंतर महापौर रितू तावडे यांचे नाव उद्‍घाटन फलकावर नसल्याने शिवसेना (ठाकरे) आणि मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठी महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटनाच्या फलकावर त्यांचे नाव नसणे हा मराठी माणसाचा अपमान असल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी केला आहे.
घाटकोपर पूर्व येथील विक्रांत सर्कल परिसराचे सुशोभीकरण स्थानिक लोकसहभाग आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर निधीतून करण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत जागतिक ऐक्याचे प्रतीक मानले जाणारे आकर्षक शिल्प उभारण्यात आले असून, त्याचे उद्‍घाटन आमदार पराग शहा आणि महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र, उद्‍घाटन फलक इंग्रजी भाषेत असून, त्यावर महापौरांचे नाव नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ठाकरे गटाचे विभागप्रमुख सुरेश पाटील म्हणाले, या कामासाठी कोणाचा निधी वापरला हा मुद्दा गौण आहे. मात्र, महापौरांच्या मतदारसंघात त्यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन होत असताना फलकावर त्यांचे नाव असायला हवे होते. त्या स्वतः मराठी असूनही त्यांचे नाव नसणे हा मराठी माणसाचा अपमान आहे. आम्ही या प्रकाराचा निषेध करतो. मनसे विभाग अध्यक्ष संदीप कुलथे यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठी महापौरांच्या मतदारसंघात चौकाचे उद्‍घाटन होते आणि फलकावर त्यांचेच नाव नसते, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. यावरून महापौरांचे पालिकेत काहीच चालत नाही, असे दिसून येते. याचा जाब मनसे नक्कीच विचारेल,’ असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट २० टक्के वाढ; पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

मोदींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदेसेनेला मिळणार आणखी दोन मंत्रीपद? या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवणार!

कोचिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल, अनेक विद्यार्थी अडकले, जीव वाचवण्यासाठी धडपड

Eastern Freeway: एमएमआरडीएच्या विस्तारीकरण प्रकल्पात बदल, ९४९ झाडे वाचणार; प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या ६ फुटीर खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT