उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : समाज माध्यमांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर प्रसारित झाल्याच्या प्रकरणामुळे उल्हासनगरातील राजकीय वातावरण तापले आहे. संबंधित व्यक्तींविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शिवसेनेच्या वतीने यासंदर्भात उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. ‘शिवाजी जावळे मित्र मंडळ’ या व्हॉट्सॲप समूहामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याविषयी आक्षेपार्ह, बदनामीकारक व दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शिवसेना विभागप्रमुख महेंद्र पाटील यांनी संबंधित व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), माहिती तंत्रज्ञान अधिनियम (आयटी ॲक्ट); तसेच इतर लागू कायद्यांनुसार तत्काळ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची मागणी केली. समाज माध्यमातून खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करून समाजात संभ्रम निर्माण करणे, जनतेची दिशाभूल करणे तसेच सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन सादर करताना युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर, उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे, जयकुमार केणी, विभागप्रमुख विनोद सालेकर, प्रमोद पांडेय, ज्ञानेश्वर मारसळे आणि शिवसैनिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.