शिवडी, ता. २२ (बातमीदार) ः जागतिक आरोग्य संघटनेने सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिलेल्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात कार्यरत असणारे मुंबईतील दीपक पेडणेकर आणि चिंचवड-पुण्यामधील उत्तम गायकवाड या विविधांगी कार्यात कुशल ठरलेल्या दोघाही सेवकांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार-२०२४’ जाहीर झाला आहे. त्याबद्दल हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मुख्य सल्लागार, कामगार नेते आमदार सचिन अहिर आणि युनियनचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दोघाही यशस्वी सेवकांचे अभिनंदन केले आहे. मुंबई विभागात २५ वर्षे कार्यरत असणारे दीपक पेडणेकर यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या उत्पादन प्रणालीनुसार उत्पादनात बेस्ट सर्विस अवॉर्ड मिळाला आहे. ते युनियनच्या सेक्रेटरीपदावर कार्यरत असून, त्यांच्या सामाजिक, कामगार चळवळ, सहकार, क्रीडा आदी क्षेत्रांतील निस्पृह कार्याची दखल घेऊन मंडळाने हा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केला आहे. उत्तम लक्ष्मण गायकवाड युनिट अध्यक्ष असून, पाली भाषेचे ते उत्तम अभ्यासक आहेत. गेल्या ३६ वर्षांतील त्यांच्या कामगार संघटना, क्रीडा, पर्यावरण संवर्धन, साहित्य, सामाजिक आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कामाची नोंद घेऊन त्यांना हा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.