अंबरनाथ, ता. २२ (वार्ताहर) : नीट परीक्षेतील गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप आणि परीक्षा केंद्रांवरील कडक नियमांमुळे देशभर वातावरण तापलेले असतानाच, काही मिनिटांच्या उशिरामुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याच्या घटना समोर आल्या. अशाच एका अडचणीत सापडलेल्या विद्यार्थिनीला अंबरनाथ पोलिसांनी वेळेवर मदतीचा हात देत तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचविले.
ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील केंद्रीय विद्यालयात नीट परीक्षेसाठी आलेल्या आलिशा या विद्यार्थिनीकडे आवश्यक असलेला पासपोर्ट आकाराचा फोटो नसल्याने परीक्षा केंद्रात प्रवेश मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यातच तिच्याकडे फोटो काढण्यासाठी आवश्यक पैसे नव्हते आणि सोबत पालक अथवा नातेवाईकही उपस्थित नव्हते. विद्यार्थिनीची घालमेल आणि वेळेची निकड लक्षात घेऊन अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद आणि सहाय्यक निरीक्षक पानसरे यांनी विद्यार्थिनीला आर्थिक मदत दिली. त्यानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह सरकारी वाहनातून तिला जवळच्या फोटो स्टुडिओमध्ये नेले. पोलिसांच्या या जलद आणि संवेदनशील कार्यवाहीमुळे विद्यार्थिनीला वेळेत प्रवेश मिळाला आणि ती नीट परीक्षा देऊ शकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.