कामोठ्यात ‘नो पार्किंग’ फलक बसविण्यास प्रारंभ
पनवेल, ता. २२ (बातमीदार) : कामोठे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सम-विषम पार्किंग तसेच ‘नो पार्किंग’ फलक बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. समाजसेवक सचिन शहाजी गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पनवेल महापालिकेने ही कार्यवाही सुरू केली असून, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहनसंख्येमुळे कामोठ्यात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने पूर्वीच सम-विषम पार्किंग व्यवस्था लागू करण्यासह आवश्यक ठिकाणी ‘नो पार्किंग’ क्षेत्र निश्चित करून फलक उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सचिन गायकवाड यांनी पनवेल महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला.
यानंतर महापालिकेने संबंधित कामासाठी मे सकुरा सिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली. शहरातील प्रमुख रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी सम-विषम पार्किंग व ‘नो पार्किंग’ फलक बसविण्याचे काम सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही कामाला गती देण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण कामोठे शहरात आवश्यक फलक उभारले जाणार आहेत.
या उपक्रमामुळे रस्त्यांवरील अव्यवस्थित पार्किंगला आळा बसण्यास मदत होईल, वाहतुकीचा वेग सुधारेल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.