मुंबई

मिठीनदीकाठच्या ६०० कुटुंबांची प्रतीक्षा कायम

CD

मिठी नदीकाठच्या ६०० कुटुंबांची प्रतीक्षा कायम
गेल्या वर्षीच्या पुरात शेकडो घरे जलमय; यंदाही संकटाची भीती
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः कुर्ला येथील मिठी नदीलगत असलेल्या क्रांतीनगर, संदेशनगर आणि सोनापूर गल्ली परिसरातील सुमारे ६०० हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन अद्यापि रखडले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी मिठी नदीला आलेल्या पुरामुळे या परिसरातील शेकडो घरे पाण्याखाली गेली होती. यंदाही पावसाळा सुरू झाल्याने पुन्हा त्याच संकटाला सामोरे जावे लागेल की काय, या भीतीत नागरिक दिवस काढत आहेत.
मुबंई उपनगरातील कुर्ला महत्त्वाचे ठिकाण असून, मिठी नदी या भागातून वाहते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने क्रांतीनगर, जरीमरी, बैल बाजार आणि टॅक्सीमन कॉलनीसारख्या सखल भागांमध्ये पाणी शिरते. पालिकेकडून विविध उपाययोजना आणि नालेसफाईची कामे करण्यात आली असली तरी पूरस्थितीचा धोका अद्याप कायम असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीने रौद्र रूप धारण केले होते. क्रांतीनगर, संदेशनगर आणि सोनापूर गल्लीतील ६०० पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरून संपूर्ण घरे जलमय झाली होती. घरांमध्ये गाळ, चिखल आणि कचरा साचल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे तसेच दैनंदिन वापराचे साहित्य नष्ट झाले. अनेक कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले, तर परिसरात साथीच्या रोगांचाही प्रादुर्भाव झाला होता.
पूरस्थितीनंतर महापालिकेने रहिवाशांना कुर्ला बैल बाजार येथील मथुराम म्युनिसिपल स्कूल आणि शिशु विकास शाळेमध्ये तात्पुरता निवारा दिला होता. मात्र, त्या काळात पुरेशा अन्नाची, आरोग्यसेवेची आणि अन्य मूलभूत सुविधांची कमतरता असल्याची तक्रार नागरिकांनी केली. काही कुटुंबांचे साहित्य चोरीला गेल्याच्याही घटना घडल्या होत्या. पूर ओसरल्यानंतर रहिवासी पुन्हा आपल्या घरात परतले; मात्र त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला होता.
प्रशासनाकडून क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील काही कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले असले, तरी सुमारे ६०० हून अधिक कुटुंबे अद्याप पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून कुर्ला येथील ‘एचडीआयएल प्रीमियर’ गृहनिर्माण संकुलात घरे देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

तीन वर्षांपासून आम्हाला घर मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून काहीही झालेले नाही. गरीब माणसाला कोणीही विचारत नाही. आम्ही दरवर्षी पाण्यात बुडून राहायचे का, आमची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
- आतिवारी कनोजिया, स्थानिक रहिवासी

गुढीपाडव्यापर्यंत घर देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत घर देण्यात आलेले नाही. परिसरातील गटारे तुंबलेली आहेत. पाऊस पडला की घरात पाणी शिरते. आमच्या घरात वृद्ध व्यक्ती आहेत. प्रशासन आमच्या जीवाशी खेळ करत आहे.
- रंजना गायकवाड, स्थानिक रहिवासी

परिसरातील गटारांची अवस्था अत्यंत बिकट आहे. गटारे साफ न झाल्याने घरात पाणी शिरते. मुसळधार पाऊस पडल्यास घर बुडून जाईल यात शंका नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तीच परिस्थिती निर्माण होणार असून, याला प्रशासनच जबाबदार आहे.
- रविना शिरसाठ, स्थानिक रहिवासी

दीड वर्षापूर्वी घराचे पत्र मिळाले. पण, प्रत्यक्षात घर मिळालेले नाही. अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले आहे. मात्र, ते कुठे आणि कसे भरायचे याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या वयात आम्हाला सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
- शेवंता कांबळे, ज्येष्ठ नागरिक

सुमारे ५० टक्के रहिवाशांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित पात्र कुटुंबांचे पुनर्वसन मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांचे तात्पुरते स्थलांतर जवळील शाळांमध्ये करण्यात येईल.
- संजय तुरडे, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

Bajrang Sonawane: बीडमधील खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune Water Issue : पाणीप्रश्‍नावरून प्रशासन धारेवर! नियोजन कोलमडल्याचा नगरसेवकांचा आरोप

SCROLL FOR NEXT