मुंबई-पुणे द्रुतगतीवर
प्रवाशांना लुटले
खालापूर, ता. २२ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकमधून प्रवास करणाऱ्या तिघांना चार जणांनी मारहाण करून लुटल्याची घटना सावराेली टाेलनाका येथे रविवारी पहाटे ३.३०च्या सुमारास घडली. त्यांच्याकडील ५४ हजार रुपयांची रक्कम चाेरट्यांनी लुटली. सुभाष झांजले, संतोष झांजले (रा. मालाड, मुंबई) हे भोर येथून मुंबईच्या दिशेने ट्रकमधून प्रवास करत हाेते. मारहाण झाल्यानंतर ट्रकचालकासह सुभाष आणि संतोष हे घाबरल्याने ते मुंबईकडे निघून गेले. त्यांनी साेमवारी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. चार अनाेळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.