मुंबई

अवचितगडाचा वारसा जपला

CD

अवचितगडाचा वारसा जपला
दोन ऐतिहासिक तोफा सुरक्षितपणे गडावर
रोहा, ता. २२ ( बातमीदार) : अवचितगडावरील ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने शिवशंभो प्रतिष्ठान, रोहा आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेने संयुक्त मोहीम राबवून सुमारे ३५० ते ४०० किलो वजनाच्या दोन ऐतिहासिक तोफा खोल दरीतून सुरक्षितपणे बाहेर काढून गडावर पुन्हा स्थापित केल्या.
१२ ते १५ जूनदरम्यान झालेल्या गड-अभ्यास मोहिमेत या तोफा गडाच्या उत्तरेकडील बुरुजाजवळील दरीत आढळून आल्या होत्या. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २० जून रोजी प्रत्यक्ष संवर्धन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पहिली तोफ सायंकाळपर्यंत गडावर आणण्यात यश आले, तर दुसरी तोफ दुर्गम दरीत असल्याने ‘टेक्निकल रोप रेस्क्यू’ प्रणाली, अचूक अँकरिंग आणि भारवाटप तंत्राचा वापर करून बाहेर काढण्यात आली.
बचाव पथकाने यापूर्वी व्यक्तींच्या बचाव मोहिमा केल्या असल्या तरी एवढ्या वजनाच्या ऐतिहासिक वस्तूची रिकव्हरी हा त्यांच्यासाठी नवा अनुभव ठरला. या मोहिमेमुळे अवचितगडाचा ऐतिहासिक ठेवा सुरक्षित झाला असून, दोन्ही संस्थांच्या कार्याचे इतिहासप्रेमींकडून कौतुक होत आहे.


फोटो कॅप्शन : , रोहा, अवचितगडावर खोल दरीतून तोफ काढून झाल्यावर सोबत सदस्य

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

Loni Kalbhor Crime: कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार लोणी काळभोरमध्ये पोलिसांच्या सापळ्यात

SCROLL FOR NEXT