मुंबई

ठाणे-ऐरोली खाडी पुल होणार

CD

कोपरी-पटणी खाडीपुलाला गती
७२३ कोटींचा खर्च अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या खाडी पुलांवरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने ठाणे-ऐरोली खाडी पूल उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७२३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ठाण्यातील कोपरी भागाला ऐरोलीतील पटणी परिसराला जोडणारा सुमारे १.४ किलोमीटर लांबीचा हा पूल नियोजित असेल.
सध्या ठाण्यातील कळवा पूल आणि मुलुंड-ऐरोली पूल या दोनच मार्गांवर खाडी ओलांडून जाणारी सर्व वाहतूक अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्याने या दोन्ही पुलांवर दररोज सकाळ-संध्याकाळ प्रचंड कोंडी होते. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगरातून नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठाणे-नवी मुंबईला जोडण्यासाठी आणखी एक खाडी पूल उभारण्याचे एमएमआरडीएने नियोजन केले आहे. कोपरी-पटणी हा खाडी पूल सहा मार्गिकांचा असून प्रत्येक दिशेसाठी तीन मार्गिका उपलब्ध असतील. २०३० पर्यंत हा खाडी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Inflation Impact: मॉन्सूनची मंद वाटचाल! महागाईचा मोठा फटका बसणार; जाणून घ्या कोणत्या वस्तू महागणार? सामान्यांच्या बजेटवर संकट

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update: पुण्याला यलो अलर्ट, पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज

रात्रीची वेळ, एसटी बसमध्ये अंधार; कंडक्टरचं महिलेशी गैरवर्तन, वाशिम-छत्रपती संभाजीनगर बसमधील प्रकार...

SCROLL FOR NEXT