मुंबई

हिमालयात नवी मुंबईचा तिरंगा

CD

नवी मुंबईकराने हिमालयात फडकावला तिरंगा

गिर्यारोहक उत्तम डे यांची ‘फ्रेंडशिप पीक’वर चढाई

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : नवी मुंबईतील गिर्यारोहक उत्तम डे यांनी हिमाचल प्रदेशातील फ्रेंडशिप पीक हे ५,२८९ मीटर उंचीचे शिखर सर करून नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. हिमालयातील पीर पंजाल पर्वतरांगेतील हे शिखर गिर्यारोहणासाठी देशातील सर्वाधिक आव्हानात्मक शिखरांपैकी एक मानले जाते.

उत्तम डे यांनी या गिर्याराेहण मोहिमेची सुरुवात मनाली येथून केली. सोलांग व्हॅली, अल्पाइन जंगल, मोरेन क्षेत्र आणि हिमनद्यांनी व्यापलेल्या कठीण मार्गातून प्रवास करून पुढे वाटचाल केली. लौहाली, लेडी लेग आणि समिट कॅम्प येथे टप्प्याटप्प्याने मुक्काम करून त्यांनी अंतिम चढाईसाठी तयारी केली.

९ जूनला रात्री ११ वाजता अंतिम चढाईला सुरुवात करण्यात आली. खिंडीपलीकडील हिमस्खलनप्रवण आणि खड्ड्यांनी भरलेल्या धोकादायक भूभागामुळे रात्री चढाई करणे आवश्यक होते. जवळपास १० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर डे यांनी १० जूनला सकाळी ६.०५ वाजता फ्रेंडशिप पीकचे शिखर गाठले. शिखरावर पोहोचताच त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला.
उत्तम डे यांच्या या यशामुळे नवी मुंबईच्या साहसप्रेमी युवकांना प्रेरणा मिळाली असून, जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही शिखर सर करता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.
----
पर्वत तुम्हाला नम्रता शिकवतात. ते नेहमीच आठवण करून देतात की स्वतःला किंवा पर्वताला कधीही कमी लेखू नका. पाय जमिनीवर ठेवून सातत्याने पुढे जात राहणे हेच यशाचे गमक आहे.
उत्तम डे, गिर्याराेहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT