एसटी बस उलटली;
१९ प्रवासी बचावले
मुरबाड, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर मानिवली फाट्याजवळ साेमवारी (ता. २२) दुपारी २.३०च्या सुमारास चाक घसरून एसटी बस उलटली. या बसमध्ये असलेले १९ प्रवासी सुखरूप बचावले आहेत. ही बस मुरबाडवरून टोकावडेकडे जात हाेती. पावसामुळे मानिवली फाट्याजवळ प्रचंड चिखल झाला हाेता. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ही घटना घडली. स्थानिकांनी मदतीला धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. यात किरकाेळ जखमी झालेल्यांना टोकवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.