मुंबई

कोतवाल, आपटे पुन्हा कोअर कमिटीत!

CD

कोतवाल, आपटे पुन्हा
कोअर कमिटीत!
बदलापूर, ता. २२ (बातमीदार) : आदर्श विद्यामंदिर शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यभर चर्चेत आलेल्या आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत वादग्रस्त उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
२०२४ मध्ये पोक्सो प्रकरणात पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांवरून गुन्हे दाखल झालेल्या आणि जामिनावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांच्या विराेधात अर्ज नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्यासह इतर उमेदवारांचीही निवड निश्चित झाली आहे.
संस्थेच्या कोअर कमिटीवरील ११ जागांसाठी सुरुवातीला १८ उमेदवार मैदानात होते. चाैघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जनार्दन घोरपडे, उदय कोतवाल, नंदकिशोर पातकर, मनोहर आंबवणे, संजय गायकवाड, रामचंद्र शेटे, राघवेंद्र देशपांडे, अशोक घोरपडे, कमलाकर शेटे, तुषार आपटे आणि मोहन जोशी यांची निवड निश्चित झाली.


दरम्यान, बदलापुरातील बहुचर्चित चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या कोतवाल आणि आपटे यांची पुन्हा एकदा संस्थेच्या व्यवस्थापनात बिनविरोध पुनर्निवड झाल्याने या निर्णयावर विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली असून, संस्थेच्या नैतिक जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Qatar LNG Plant Explosion : कतारच्या एलएनजी प्लँटमध्ये भीषण स्फोट; १२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, भारतीय दुतावासाकडून चिंता व्यक्त

Pakistan Water Shortage: पाकच्या हैदराबादमध्ये भीषण पाणीटंचाई; उद्योग क्षेत्र संकटात, उत्पादनावर परिणाम; जनजीवन विस्कळित

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात लागताच फोन, ओमराजेंना काय सांगितलं? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

Nagpur: ४२ वर्षीय डॉक्टरनं भुलीचं इंजेक्शन टोचून घेत आयुष्य संपवलं, ५ दिवसांपासून गेले नव्हते घरी

Latest Marathi News Live Update : उत्तर महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळा, SIT च्या तपासात धक्कादायक बाब समोर

SCROLL FOR NEXT