मुंबई

विक्रमगड केंद्रशाळेत योगाची प्रात्यक्षिके

CD

विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा परिषद केंद्रशाळा विक्रमगड येथे मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून साजरा करण्यात आला. योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योगासने व प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी सामूहिकरीत्या शिथिलीकरण क्रिया, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, भुजंगासन यांसह विविध योगासने केली. तसेच कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांची माहिती देण्यात आली. सर्वांनी एकत्रितपणे कॉमन योग प्रोटोकॉलचे पालन करत योगाभ्यास केला.
या वेळी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व समजावून सांगताना मुख्याध्यापिका सिंधू सहारे, पदवीधर शिक्षिका रंजना भोईर, शिक्षक संजय चौधरी आणि शिक्षिका निर्मला महाकाळ यांनी योगामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते तसेच एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते, असे मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पबवर पहाटे ३ वाजता पोलिसांची धाड, सुरू होता धक्कादायक प्रकार; ८० ते १०० तरुण तरुणी ताब्यात

Satej Patil Dhananjay Mahadik : बंटी पाटील-मुन्ना महाडिक तब्बल १२ वर्षांनी एकत्र; डी. वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा, सतेज-संजय पाटील यांचे कौतुक

Indian Air Force Office: पाकच्या ‘हनीट्रॅप’मध्ये हवाई दलाचा अधिकारी; लष्कराची माहिती पाकिस्तानला दिली

Marathi News Live Updates : धबधब्यात दगडांवरून पाय घसरून पडला, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT