मुंबई

वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाला गती

CD

विरार, ता. २३ (बातमीदार) : वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीसंदर्भातील कार्यवाही सध्या प्रगतिपथावर असून, त्यासाठी आवश्यक पाठपुरावा वेगाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे नवनियुक्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांची वसई न्यायालय इमारत समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या शिष्टमंडळामध्ये ॲड. विल्यम फर्नांडिस, प्रकाश कोठावळे, भरत पाटील आणि जॉर्ज फरगोज यांचा समावेश होता. बैठकीदरम्यान वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या प्रस्तावित आराखड्याबाबत उच्च न्यायालयाने मागविलेल्या खुलाशासंदर्भात शुक्रवारी (ता. १९) आवश्यक उत्तर सादर करण्यात आल्याची माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी दिली. तसेच या विषयाचा पुढील पाठपुरावा उच्च न्यायालय स्तरावर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांमध्ये समाधान
याशिवाय वसई न्यायालयातील न्यायदान कक्षाची संख्या वाढविणे, निकाली निघालेल्या प्रकरणांच्या नोंदी अन्यत्र हलवून अतिरिक्त जागा उपलब्ध करणे, कर्मचारी संख्या व न्यायालयीन सुविधा वाढविणे तसेच प्रलंबित प्रकरणांच्या फाईल्सचे डिजिटलायझेशन करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर वसई न्यायालयाच्या नवीन प्रशस्त इमारतीची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त होत आहे. या प्रकल्पास गती मिळत असल्याने वसई तालुक्यातील वकील, पक्षकार आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT