सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : दिवा परिसरातील अनधिकृत गोदामांविरोधात ठाणे महापालिकेने सोमवारी धडक कारवाई करत ११३ गोदामांवर हातोडा मारला. विशेषतः रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ आणि स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोदामांना लक्ष्य करण्यात आले. आतापर्यंत ८३० गोदामांचे सर्वेक्षण पूर्ण केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत गोदामांचा प्रश्न काही वर्षांपासून गंभीर बनला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पालिकेच्या महासभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात धोकादायक स्वरूपाच्या वस्तूंची साठवणूक करणाऱ्या गोदामांना लक्ष्य करण्यात आले आहे. रसायने, प्लॅस्टिक, ज्वलनशील पदार्थ आणि स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोदामांमुळे दुर्घटनांचा धोका अधिक असल्याने अशा ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
अनधिकृत गोदामांचे सर्वेक्षण सुरूच
शासकीय, आरक्षित तसेच सरकारी भूखंडांवर उभारलेल्या अनधिकृत गोदामांची तपासणी आणि सर्वेक्षण सुरूच ठेवले आहे. सर्वेक्षणात नियमबाह्य आढळणाऱ्या गोदामावर पुढील काळातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार ही मोहीम अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त जितेंद्र निकम, उपायुक्त दीपक झिंजाड तसेच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांनी सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.