मुंबई

इस्कॉन मंदिरात २९ जूनला जगन्नाथ स्नानयात्रा महोत्सव

CD

भिवंडी, ता. २३ (वार्ताहर) : भिवंडीतील मानसरोवर येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा माधव मंदिरात सोमवारी (ता. २९) भगवान श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या पवित्र स्नानयात्रा महोत्सव होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान असणार आहे. वैदिक परंपरेनुसार या दिवशी भगवानांना पवित्र स्नान घालून विशेष अभिषेक करण्यात येणार आहे. महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे उपस्थित प्रत्येक भक्ताला स्वतःच्या हस्ते भगवानांचा अभिषेक करण्याची संधी मिळणार आहे. अभिषेकासाठी आवश्यक सर्व व्यवस्था मंदिर प्रशासनातर्फे केली असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन इस्कॉन मंदिर प्रशासनाने केले आहे. भगवान जगन्नाथांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scholarship Exam : चौथी, सातवीच्या गुणवत्तायादीत पुणे अव्वल; ९२ विद्यार्थ्यांपैकी ८७ विद्यार्थी झेडपी शाळेतील

FDA: एफडीएची करडी नजर! वसई-विरार शहरात प्लॅस्टिकसह भेसळीवर कारवाई सुरू

Hockey World Cup Schedule: स्वातंत्र्यदिनापासून सुरू होणार थरार! IND vs PAK सामना कधी अन् कुठे पाहाता येणार? जाणून घ्या सर्वकाही

Marathi News Live Updates : 'या' तारखेला होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी

Gen Z-Gen Alpha Film Initiative: जेन झी-जेन अल्फासाठी दर्जेदार चित्रपटांचे दर्शन; स्वातंत्रदिनापासून राज्यभर १०० कॅम्पस फिल्म सोसायटीजचा उपक्रम

SCROLL FOR NEXT