मुंबई

मेघरेच्या बौद्धवाडीत विहीर खोलीकरणामुळे पाणीटंचाईवर मात

CD

मेघरेच्या बौद्धवाडीत विहीर खोलीकरणामुळे पाणीटंचाईवर मात
१२० कुटुंबांना दिलासा
श्रीवर्धन, ता. २३ (वार्ताहर) : श्रीवर्धन तालुक्यातील मेघरे गावातील बौद्धवाडीतील अनेक वर्षांपासूनची पाणीटंचाई अखेर दूर झाली आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेमधून विहिरीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले असून, या कामामुळे विहिरीला मुबलक पाणी लागले आहे. परिणामी बौद्धवाडीतील सुमारे १२० कुटुंबांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला असून, वाडी पाणीटंचाईमुक्त झाली आहे.
मेघरे येथील पाणीटंचाईची गंभीरता लक्षात घेऊन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रश्नाची दखल घेत विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत या कामाला मंजुरी मिळाली. मंजूर निधीतून विहिरीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि मजबुतीकरणाची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात आली.
या कामानंतर विहिरीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा निर्माण झाला असून, उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मेघरे आणि परिसरातील पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
मेघरे गावातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी श्रीवर्धनचे माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून हे काम नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः महिलांची पाण्यासाठीची दैनंदिन पायपीट थांबल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

चौकट
महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली
मेघरेच्या बौद्धवाडीत अनेक वर्षे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब अंतरावर जावे लागत होते. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ येत होती. विहीर खोलीकरणामुळे आता वाडीमध्येच मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने महिलांची दैनंदिन पाण्यासाठीची धावपळ पूर्णपणे थांबली आहे. यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार असून, घरगुती कामे, मुलांची काळजी आणि इतर उपजीविकेच्या कामांसाठी अधिक वेळ देता येणार आहे. गावाच्या दृष्टीने हा केवळ जलस्रोताचा विकास नसून ग्रामीण जीवनमान उंचावणारा आणि पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय ठरणारा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई पुण्यासह महाराष्ट्राला सुखावणारी बातमी! मान्सून पुन्हा सक्रिय, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Traffic Rules : वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक नियम मोडल्यास आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; पोलिसांचा मोठा निर्णय

विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Marathi News Live Updates: विरोधकांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब

Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

SCROLL FOR NEXT