मुंबई

‘केईएम’ रुग्णालयाच्या नामांतराचा निर्णय नाही!

CD

केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा निर्णय नाही!
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टोक्ती
मुंबई, ता. २३ : किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून, याबाबत मुंबई महापालिकेकडून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
केईएमचे नाव ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल रुग्णालय’ करण्याचा प्रस्ताव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून मांडण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर आणि सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. सुमारे १०० वर्षांचा इतिहास असलेल्या केईएम रुग्णालयाचे नाव बदलल्यास त्याचा ऐतिहासिक वारसा पुसला जाईल, अशी भीती विविध संघटना आणि नागरिकांनी व्यक्त केली. रुग्णालयाच्या नामांतराला काही सामाजिक संघटनांसह निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेही (मार्ड) विरोध दर्शविला आहे. जगभरात केईएम या नावाने रुग्णालयाची ओळख निर्माण झाली असून, हेच नाव कायम ठेवण्याची मागणी निवासी डॉक्टर संघटनेकडून करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या शैक्षणिक, वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्रातील योगदानामुळे केईएमची स्वतंत्र ओळख निर्माण झाल्याचेही संघटनांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या विषयावर विधान परिषदेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत महापालिकेकडे विनंती प्राप्त झाली असली, तरी त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे केईएम रुग्णालयाचे नामांतर होणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम असून, महापालिकेच्या निर्णयाकडे वैद्यकीय क्षेत्रासह मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

Latest Marathi News Live Update : अयोध्या: देणगी चोरी प्रकरणी एसआयटीचा अहवाल सादर

Thane Illegal Schools: प्रवेशापूर्वी सावध व्हा! ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रशासनाचा इशारा

SCROLL FOR NEXT