सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळविण्यासाठी पूर्वी जिल्हा किंवा मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागत होती. मात्र, टेलिमेडिसिन आणि ई-संजीवनी सेवेमुळे आता घरबसल्या वैद्यकीय सल्ला उपलब्ध होत असून, राज्यातील तब्बल १.२९ कोटींहून अधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
राज्यात इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरत आहे. सध्या जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडण्यात आले असून, स्थानिक डॉक्टरांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी झाली आहे.
व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांचा सल्ला
आयुष्मान भारत योजनेंतर्गत राज्यातील हजारो आरोग्य केंद्रांमध्ये टेलीकन्सल्टेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, नागरी आरोग्य केंद्रे आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांमधून ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोना काळात सुरू झालेली ई-संजीवनी ओपीडी सेवा आजही नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. या ऑनलाइन व्यासपीठावरून रुग्णांना व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांचा सल्ला, ई-प्रिस्क्रिप्शन तसेच विविध तज्ज्ञ सेवांचा लाभ मिळत आहे.
‘ई-संजीवनी’ सेवा ग्रामीण भागाचा आधार
अस्थिरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग, मानसोपचार, नेत्ररोग यांसह आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी उपचारपद्धतींच्याही सेवा उपलब्ध आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डिजिटल आरोग्यसेवेचा विस्तार झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि आर्थिक भार कमी झाला आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि दुर्गम भागातील रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. डिजिटल आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख होत असून, ई-संजीवनी आणि टेलिमेडिसिन या सेवा ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार बनत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.