मुंबई

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीत विकासकामांना हिरवा कंदील

CD

पनवेलच्या स्थायी समितीत विकासकामांना हिरवा कंदील
मोबाईल टॉयलेट, दफनभूमी, रस्ते, उद्याने, पथदिव्यासह विविध विषयांना मंजुरी
पनवेल, ता. २३ (बातमीदार) ः पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहराच्या विकासाला आणि नागरी सुविधांना गती देणाऱ्या विविध महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात झालेल्या या बैठकीत स्वच्छता, पायाभूत सुविधा, उद्यान विकास, आरोग्य आणि विद्युत व्यवस्थेशी निगडित अनेक कामांना हिरवा कंदील दाखवण्यात आला.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, सचिव नानासाहेब कामठे, उपसचिव अक्षय कदम, उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्यासह स्थायी समिती सदस्य व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
सभेत पालिकेसाठी तीन वर्षांच्या वॉरंटीसह २० फिरती स्वच्छतागृहे (मोबाईल टॉयलेट) खरेदी करण्याच्या निविदेस मंजुरी दिली. तक्का येथील मोराज सोसायटी रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी देतानाच कामोठे, कळंबोली आणि खारघरमधील विविध रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याच्या कामालाही स्थायी समितीने मान्यता दिली.
याशिवाय शहरातील गटारे, पादचारी मार्गावरील इन्स्पेक्शन चेंबर्सची झाकणे बसविणे, एफआरपी कव्हर्स बसविणे, वॉर्ड कार्यालयांमधील फर्निचर व्यवस्था, विद्युत खांब व वाहिन्यांचे स्थलांतर, पथदिव्यांची देखभाल-दुरुस्ती, महापालिका इमारतींमधील वातानुकूलित यंत्रणांची निगा राखणे आदी कामांनाही मंजुरी देण्यात आली.

आरोग्यविषयक निर्णय
शहरातील विविध उद्यानांमध्ये डेकोरेटिव्ह पथदिवे उभारणे तसेच डेंगी, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने धुरीकरण व फवारणी सेवा राबविण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीच्या या निर्णयांमुळे पनवेल शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम होण्यासोबतच स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या विकासाला गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT