मुंबई

अनधिकृत बांधकामांवर महापौर संतप्त

CD

भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : मिरा भाईंदर शहरात प्रत्येक प्रभागात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांकडून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे महापौर डिंपल मेहता यांच्या अनधिकृत बांधकामाविषयीच्या झीरो टॉलरन्स धोरणावर जाहीर टीका होऊ लागली. सोमवारी (ता. २२) झालेल्या महासभेत प्रशासनाच्या निष्क्रियतेवरून महापौर चांगल्याच संतप्त झाल्या. कोणत्याही राजकीय नेत्याचा फोन आला तरी अनधिकृत बांधकामावरील कारवाई थांबवायची नाही, असा सज्जड दमच त्यांनी प्रशासनाला दिला.

महापौरपदाची सूत्रे घेताच शहरातील अनधिकृत बांधकमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. अनधिकृत बांधकामे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असे धोरणच त्यांनी जाहीर केले होते. मात्र अनधिकृत बांधकामांवर कारवाई तर झालीच नाही उलट प्रत्येक प्रभागात बेधडक अनधिकृत बांधकामे होऊ लागली आहेत. प्रभाग अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही ते ऐकत नसल्याच्या तक्रारी सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी झालेल्या महासभेत केल्या. प्रभाग अधिकाऱ्यांना कारवाईविषयी विचारल्यानंतर राजकीय नेत्यांचे फोन आल्याने कारवाई केली नसल्याची उत्तरे प्रभाग अधिकारी देत असल्याचेही नगरसेवकांनी महापौरांच्या निदर्शनास आणले.

कारवाईचा अहवाल द्यावा

अनधिकृत बांधकामांविषयी झीरो टॉलरन्स धोरण घोषित केल्यानंतरही कारवाई का केली जात नाही, असा खरमरीत जाब महपौरांनी भरसभेत विचारला. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना ताबडतोब सभागृहात पाचारण करा, असे आदेश महापौरांनी दिले. मात्र एकही प्रभाग अधिकारी हजर झाला नाही. त्यामुळे महपौरांचा पारा आणखी चढला. यापुढे दर आठवड्याला कारवाईचा अहवाल द्या, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Crash: शेअर मार्केट क्रॅश! सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले

Mumbai: सायकल ट्रॅक, जिम, 60 हजार झाडं... मुंबईला ‘सेंट्रल पार्क’ची भेट मिळणार! लंडन-न्यूयॉर्कला टक्कर देणार; काय सुविधा असणार?

World Olympic Day 2026: २३ जूनलाच का साजरा केला जातो ऑलिम्पिक दिन; यंदाची थीम काय ? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व !

ITR Filing 2026: कर बचतीची संधी सोडू नका! New Tax Regime मधील हे 8 फायदे बहुतेकांना माहितीच नाहीत

Latest Marathi News Live Update : सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT