मुंबई

नवी मुंबईतील व्यावसायिकाला २.२८ कोटींचा गंडा

CD

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाला २.२८ कोटींचा गंडा
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करून त्यावर भरघोस नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून सायबर टोळीने रबाळे येथील एका व्यावसायिकाला दोन कोटी २८ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नईम अब्दुल शक्कूर कच्छी हे रबाळे एमआयडीसीत राहण्यास असून, त्यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ९ मार्च रोजी सायबर टोळीतील भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधत एक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. त्यानंतर ग्रुप ॲडमीन प्रिया शर्मा आणि भरत शहा यांनी नईम यांना जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखवून आस्क आय एम पीआरओ नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन आणि आस्क इनव्हेस्टमेंट मॅनेजर कंपनीच्या वेब पेजवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला सायबर टोळीने नईम यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम पाठवण्यास सांगून परतावादेखील दिला. त्यानंतर या टोळीने गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळत असल्याचे आभासी (व्हर्च्युअल) पेजवर दाखवून नईम यांना अधिक रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे नईम यांनी एकूण दोन कोटी २८ लाख ८० हजार ७२८ रुपये गुंतवले. मात्र, त्यांनी स्वतःचे पैसे आणि मिळालेला नफा काढण्याचा प्रयत्न केला असता ती मिळाली नाही. त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

SCROLL FOR NEXT