मुंबई

रायगडमध्ये फळलागवडीची लगबग

CD

रायगडमध्ये फळलागवडीची लगबग
अनियमीत भातशेतीला फाटा; तीन हजार हेक्टरवर नवी फळबाग
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २३ : मॉन्सूनच्या आगमनाबरोबरच रायगड जिल्ह्यात फळबाग लागवडीची लगबग सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यात तब्बल तीन हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने फळलागवड केली जाणार आहे. पारंपरिक भातशेती आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा कल फळपिकांकडे वाढला असून, हापूस आंबा लागवडीला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये यंदा तीन लाख ७७ हजार १६१ रोपे तयार करण्यात आली असून, ती शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी खासगी रोपवाटीकांमधून हापुस, सुपारीची रोपे खरेदी केली आहेत. या रोपांच्या लागवडीसाठी जमिनीत खड्डे खोदने, जमिनीची मशागत करणे अशी तयारी केली जात आहे.
यंदा अनियमित मॉन्सूनचा फटका येथील भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे, भविष्यात अशा प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून शेताच्या बांधावर, घराच्या बाजूला मोकळ्या जागेत, नारळ-सुपारीसह आंबा, काजूची लागवड करण्यावर भर दिला जात आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणासाठी राबविण्यात आलेल्या प्रोत्साहनपर योजनांचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी फळबागांचे क्षेत्र वाढविले आहे. परिणामी, पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी किनारपट्टीपुरती मर्यादित असलेली फळलागवड आता जिल्ह्याच्या अंतर्गत भागातही विस्तारत आहे.
---
बागांच्या क्षेत्रात वाढ
रायगड जिल्ह्यातील फळबागांचे एकूण क्षेत्र सध्या ६९ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. हे क्षेत्र जिल्ह्यातील एकूण लागवडक्षम क्षेत्राच्या सुमारे ६० टक्के आहे. कागदोपत्री जिल्ह्यात सुमारे एक लाख २० हजार हेक्टर खरीप लागवडक्षम क्षेत्र असले, तरी प्रत्यक्षात केवळ ९० हजार हेक्टरवरच लागवड केली जाते. यामध्ये भात, नाचणी, मुग यांसारख्या पिकांचाही समावेश आहे.

---
रायगडमध्ये फळबागांचे चित्र
नव्याने होणारी फळलागवड : ३ हजार हेक्टर
रोपवाटिकांतील उपलब्ध रोपे : ३.७७ लाख
फळबागांचे एकूण क्षेत्र : ६९ हजार हेक्टर
खरीप लागवडक्षम क्षेत्र : १.२० लाख हेक्टर
प्रत्यक्ष लागवड : ९० हजार हेक्टर
सर्वाधिक पसंती : हापूस आंबा
---
काजू, नारळ व सुपारी या पारंपरिक बागायती पिकांपेक्षा हापूस आंब्याला अधिक मागणी असून, दरवर्षी साधारण चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्राची भर पडत आहे. पावसाची अनियमितता, सिंचनासाठी पाण्याची कमतरता आणि जमिनीचा दर्जा लक्षात घेता फळझाडांची लागवड अधिक किफायतशीर ठरत आहे.
- आत्माराम पाटील, प्रयोगशील शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Security: चारधाम यात्रेच्या सुरक्षेसाठी ‘नभ नेत्र’ ड्रोन; ५ किमी परिसरातील भाविकांवर ठेवणार नजर

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT