मुंबई

नालासोपारा स्थानकावर ‘धक्का’ ठरला शिक्षेचे कारण!

CD

नालासोपाऱ्यात ‘धक्का’ ठरला शिक्षेचे कारण!
विनयभंगाच्या संशयातून प्रवाशाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

नालासोपारा, ता. २३ (बातमीदार) : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील गजबजलेल्या नालासोपारा रेल्वे स्थानकात एका प्रवाशाला विनयभंगाच्या संशयावरून काही प्रवाशांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (ता. २२) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर घडली.
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओनुसार आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, एक तरुण लोकल ट्रेनमधून उतरत असताना गर्दीत एका अल्पवयीन मुलीला त्याचा धक्का लागला. धक्का लागल्यानंतर काही प्रवाशांना त्या तरुणाची हालचाल संशयास्पद वाटली आणि त्यांनी त्याच्यावर मुलीशी विनयभंग केल्याचा आरोप केला. त्यानंतर संतप्त झालेल्या काही प्रवाशांनी तरुणाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. व्हायरल व्हिडिओमध्येही काही जणांनी त्या तरुणाला मारहाण केल्याचे दिसून येत आहे.
मात्र संबंधित मुलीसोबत प्रत्यक्षात विनयभंग झाला होता की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
--------------------
व्हायरल व्हिडिओची पडताळणी
वसई रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले, की याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित तरुणाला सोडून देण्यात आले. सध्या पोलिसांकडून व्हायरल व्हिडिओची पडताळणी आणि तपास सुरू असून, कोणत्याही संशयास्पद घटनेत नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT