मुंबई

ह.भ.प. गंगाराम महाराज ठाकूर यांचे निधन

CD

डोंबिवली, ता. २३ : डोंबिवलीच्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आणि निष्ठावंत वारकरी; तसेच संत सावळाराम महाराजांचे पट्टशिष्य ह.भ.प. गंगाराम महाराज ठाकूर यांचे वयाच्या ९४व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच डोंबिवली परिसरासह ठाणे, रायगड आणि वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्यावर सोनारपाडा गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगाराम महाराज यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाची शिकवण, गुरुभक्ती आणि समाजप्रबोधनाचे कार्य अत्यंत निष्ठेने केले. संत सावळाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले. साधी राहणी, नम्र स्वभाव, अध्यात्मिक जीवनशैली आणि समाजाशी असलेली नाळ यामुळे त्यांनी असंख्य भक्तांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह, धार्मिक सोहळे आणि वारकरी परंपरेचे विविध उपक्रम यशस्वी पार पडले. गंगाराम महाराज यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक, तर समाजाने एक साधेपणाने जगणारा आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना भक्त आणि अनुयायांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

स्टार प्रवाहच्या आठ मालिकांना आव्हान द्यायला येतायत झी मराठीचे २ नवे मोहरे; टीआरपीमध्ये कोण मारणार बाजी?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

लोकप्रियता, पैसे सगळं आहे तरीही प्राजक्ता माळीचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण; म्हणते, 'मला मुंबईत...'

SCROLL FOR NEXT