मुंबई

पनवेल महापालिकेच्या महासभेत विकासकामांना हिरवा कंदील

CD

पनवेल महापालिका महासभेत विकासकामांना हिरवा कंदील
प्रभाग समित्या, उद्याने, वृक्ष प्राधिकरण, धुरीकरण सेवेसह विविध महत्त्वाच्या विषयांना मंजुरी
पनवेल, ता. २३ (बातमीदार) : पनवेल पालिकेची महत्त्वपूर्ण महासभा मंगळवारी (ता. २३) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या महासभेत शहराचा विकास, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली असून, अनेक मोठ्या विकासकामांना मंजुरी दिली आहे.
या वेळी उपमहापौर प्रमिला पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, पालिका सचिव नानासाहेब कामठे, उपसचिव अक्षय कदम यांच्यासह सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता म्हात्रे, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महासभेत महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम २९ (अ) नुसार प्रभाग समित्या स्थापन करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. तसेच पनवेल शहरासाठी शहर हवामान कृती योजना तयार करण्यासाठी ६४ लाख रुपयांच्या निधीतून त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली. खारघर सेक्टर १२, भूखंड क्रमांक १ आणि सेक्टर १४, भूखंड क्रमांक ९ येथे उद्याने विकसित व नूतनीकरण करण्याच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच पनवेल क्षेत्रासाठी वृक्ष प्राधिकरण समिती गठित करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
महापालिकेसाठी विविध प्रकारची वाहने चालकांसह भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी ई-निविदा मागविण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच डम्पर, टिपर, क्रेन, पोकलेन, हायड्रा, टोइंग व्हॅन इत्यादी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील देण्यात आला.
भिंगारी गावातील अंतर्गत गटार बांधकाम, कळंबोली गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटार बांधकाम, नवीन मुख्यालयासमोरील रस्त्यावर डेकोरेटिव्ह पथदिवे उभारणे तसेच शहरात यांत्रिकी पद्धतीने धुरीकरण व फवारणी सेवा पुरविण्याच्या विषयांनाही महासभेने मंजुरी दिली.

पाणी साठवणुकीसाठी देहरंग येथे बॅरेजचा प्रस्ताव
दरम्यान, देहरंग येथे पाणी साठवणुकीसाठी बॅरेज बांधण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंडअंतर्गत सादर करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच पनवेल शहरातील बहुमजली वाहनतळ व दुकाने उभारण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. मात्र कोळीवाडा मार्केट यार्ड परिसरातील स्मशानभूमी विकास, खारघर सेक्टर ७ मधील उद्यान विकास आणि देहरंग धरणातून वाढीव पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील विषय महासभेत स्थगित ठेवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

Thane Illegal Schools: प्रवेशापूर्वी सावध व्हा! ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रशासनाचा इशारा

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT