मुंबई

कोट्यवधींच्या सीसीटीव्ही प्रकल्पाचा बोजवारा

CD

कोट्यवधींच्या सीसीटीव्ही प्रकल्पाचा बोजवारा
स्मार्ट सिटीच्या सुरक्षिततेच्या दाव्यांना लागलेले सुरुंग
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : शहराच्या कानाकोपऱ्यावर अहोरात्र नजर ठेवण्यासाठी, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आणि वाढत्या नागरी गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पालिकेने अलीकडेच शहरात नव्याने उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण शहरात एक हजार ४१४ कॅमेरे बसवले. मात्र हे जाळे अवघ्या काही महिन्यांतच पूर्णपणे विस्कळित झाल्याची आणि प्रशासनाच्या निष्काळजीची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला होऊ शकला नाही.
नवी मुंबई पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी माहिती मागवली होती. शहरात नव्याने बसवलेल्या एक हजार ४१४ कॅमेऱ्यांपैकी तब्बल ३२६ कॅमेरे सध्या पूर्णपणे बंदावस्थेत असल्याचे पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने लेखी उत्तरात अधिकृतपणे मान्य केले आहे. या प्रकल्पाच्या विशिष्ट टप्प्यासाठी आणि त्याच्या तातडीच्या देखभालीसाठी पालिकेने तिजोरीतून तब्बल दोन कोटी ७५ लाख खर्च केले आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प आणि त्याचे देखभाल कंत्राट टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड या देशातील नामांकित आणि संरक्षण क्षेत्रात कार्यरत कंपनीला दिले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्चून आणि जागतिक दर्जाच्या कंपनीकडे या कामाची जबाबदारी सोपवूनही २३ टक्क्यांहून अधिक कॅमेरे बंद पडल्याने नवी मुंबईकरांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे.

सीसीटीव्ही प्रकल्पाचे स्वरूप
शहरात एकूण एक हजार ५२४ कॅमेरे बसवण्याचे प्रस्तावित होते. त्यापैकी आतापर्यंत एक हजार ४१४ कॅमेरे यशस्वीरीत्या बसवले आहेत. या प्रणालीमध्ये विविध प्रकारच्या प्रगत कॅमेऱ्यांचा समावेश केला होता.
अत्याधुनिक कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण आणि नियंत्रण सीबीडी बेलापूर येथील पालिकेच्या मुख्यालयात उभारलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून २४ तास केले जाते. तसेच एक समांतर नियंत्रण व्यवस्था नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातही दिली आहे. सोबतच ४३ महत्त्वाच्या ठिकाणी महिला आणि आपत्कालीन मदतीसाठी पॅनिक अलार्म आणि कॉल बॉक्सेस बसवण्याचीही योजना या प्रकल्पात अंतर्भूत आहे.
आजमितीस एक हजार ४१४ पैकी ३२६ कॅमेरे खांबांवर लटकणाऱ्या निव्वळ शोभेच्या बाहुल्या बनून राहिले आहेत.

प्रशासनाची निष्काळजी?
शहरात ठिकठिकाणी सुरू असलेले रस्ते आणि गटारांचे खोदकाम, त्यामुळे भूमिगत फायबर ऑप्टिकल केबल तुटणे आणि उपकरणांमधील अचानक उद्भवलेल्या तांत्रिक त्रुटी यामुळे हे शेकडो कॅमेरे बंद पडल्याचा पोकळ दावा प्रशासनाने केला आहे. पालिकेच्या विविध विभागांमधील समन्वयाचा पूर्ण अभाव, नियोजनाचा बोजवारा आणि कंत्राटदाराची कमालीची बेपर्वाई विदारक स्वरूपात उघड होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT