मुंबई

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ७९२ सदनिकांची गुरूवारी सोडत

CD

म्हाडा पुणे मंडळाच्या ७९२ सदनिकांसाठी गुरुवारी सोडत
अल्प, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांसाठी १,४२२ अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे येथील ताथवडे टप्पा-२ गृहनिर्माण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील २४ आणि मध्यम उत्पन्न गटातील ७६८ सदनिका अशा एकूण ७९२ सदनिकांच्या विक्रीसाठी लाॅटरी जाहीर केली होती. त्यानुसार आलेल्या १,४२२ अर्जांची गुरुवारी (ता. २५) दुपारी १२.३० वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते मंडळाच्या कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ताथवडे पुणे टप्पा-२ गृहनिर्माण योजनेअंतर्गत २४ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रति सदनिकेची किंमत ४६ ते ४७ लाख रुपयांदरम्यान असून, बांधकामाचे क्षेत्रफळ ७५.९६ ते ७७.९९ चौरस मीटर आहे. याच प्रकल्पात मध्यम उत्पन्न गट योजनेअंतर्गत ७६८ सदनिका असून, प्रति सदनिकेची किंमत ६४.५० ते ६५.५० लाख रुपयांदरम्यान आहे व बांधकामाचे क्षेत्रफळ ८९.१५ ते ९१.१८ चौरस मीटर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddhivinayak Temple : ठाकरे गटाची अडचण वाढणार? सिद्धिविनायक मंदिरातील देणगी व्यवहारांची मागील पाच वर्षांची होणार चौकशी; सीएम फडणवीसांचे आदेश

IPL 2027 Trade Update: हार्दिक पांड्याच नव्हे, तर Mumbai Indians 'या' पाच खेळाडूंना करू शकते संघाबाहेर; MI चा मास्टर प्लान

Missing Link: मिसिंग लिंक अपघाताआधी काय घडलं? किरकोळ अपघातामुळे २ मार्गिका बंद, वाहनांनी अचानक लेन बदलताच फॉर्च्युनरची ट्रकला धडक

Latest Marathi News Live Update : "मोदी गद्दारांना सांगतायत, भीऊ नका मी पाठीशी"- उद्धव ठाकरे

स्टार प्रवाहची आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांनी शेअर केल्या पोस्ट; बांदेकरांच्या सुनेशी आहे संबंध

SCROLL FOR NEXT