मुंबई

शिवसेना उबाठाच्या जिल्हाप्रमुखाने आदिवासींना घातला गंडा

CD

जिल्हाप्रमुखाकडून आदिवासींची फसवणूक
घरकुल योजनेसाठी २३ लाख उकळले; गुन्हा दाखल
वाडा, ता. २३ (बातमीदार) ः शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळवून देण्याच्या नावाखाली शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख ओंकार पाटील याने शंभराहून अधिक गोरगरीब आदिवासींची फसवणूक करत लाखो रुपयांना गंडा घातल्याने त्याच्या विरोधात वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पालघरच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेल्या ओंकार पाटील आणि त्याचा सहकारी कल्पेश वरठा यांनी वाडा, विक्रमगड, जव्हार, पालघर तालुक्यातील गोरगरीब आदिवासींना शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळवून देतो असे सांगितले. त्याअंतर्गत सुमारे ११५ आदिवासींकडून प्रत्येकी २० हजार रुपये उकळत त्यांना २३ लाखांना गंडा घातला. २०२३-२०२४ मध्ये ओंकार पाटील आणि कल्पेश वरठा यांनी विविध आदिवासी गाव-पाड्यांमध्ये बैठका घेतल्या. घरकुल मिळवून देण्याच्या प्रलोभनातून अशिक्षित भोळ्याभाबड्या आदिवासींना पैसे देण्यास भरीस घातले. वाडा तालुक्यातील वाडा, वरले, मांगरूळ विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी, खांड, फुफाणेपाडा, दादाडे, धानी, सवादे, मोह-पैकी भिंबरपाडा, मोह पैकी धिंडेपाडा, टेटवाली, माले-साठेपाडा, उघाणीपाडा, आलोंडे, सातकोर, उपराळे, आपटी खुर्द, ठाकूरपाडा,तांबडमाळ, भोपोली, बोरांडा, शीळ, वरठेपाडा, सारशी, चिंचघर, वेहेळपाडा, जव्हार तालुक्यातील अडखड, वाळवंडा, पालघर तालुक्यातील तामसई, नांदगाव आदी गावांतील सुमारे ११५ आदिवासींनी घरकुल मिळेल या आशेने ओंकार पाटील आणि कल्पेश वरठा यांना प्रत्येकी २० हजार रुपये दिले. मात्र, घरकुल मिळाले नसल्याने त्यांनी पाटील व वरठा यांच्याकडे आपले पैसे परत मिळावेत म्हणून तगादा लावला. मात्र, त्यांनी या आदिवासींना पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने अखेर या आदिवासींनी वाडा पोलिस ठाण्यात जिल्हाप्रमुख ओंकार पाटील आणि कल्पेश वरठा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला
दरम्यान, आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनाकरिता अर्ज केला होता. त्या वेळी हा जामीन अर्ज फेटाळल्याने आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या वेळी त्यांना अंतरिम जामीन देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT