सीएसआर निधीबाबत प्रशिक्षण
पुणे, ता. २३ : एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. सीएसआर निधीमधून त्यांना ही गरज भागवता येते. मात्र हे निधी कसे मिळवावे, यासाठीचे नियम व कायदे काय आहेत, संस्थेचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा सादर करावा, याची बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर ट्रेनिंग २७ जूनला आयोजिले आहे. यात सीएसआर नेमके काय आहे आणि काय नाही, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टिंग फ्रेमवर्क, अंमलबजावणी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतरची प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर निधीसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया आदी बाबींवर मार्गदर्शन होणार आहे.
व्यावसायिक स्नॅक्स मेकिंग कार्यशाळा
कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि वर्षभर सातत्याने मागणी असलेला नाश्ता व स्नॅक्स व्यवसाय उभारण्यासाठीची कार्यशाळा २७ व २८ जूनला होणार आहे. कार्यशाळेत व्यावसायिक पद्धतीने नाष्टा सेंटर, स्नॅक सेंटर किंवा छोटे हॉटेल सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान, पदार्थ तयार करण्याच्या अचूक कृती आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. सहभागींसाठी स्पेशल मिसळ, व्हेज पॅटीस, ब्रेड पॅटीस, बटाटा वडा, कांदा भजी, पोहे, उपीट, शिरा, खिचडी, साबुदाणा वडा, उपवासाची मिसळ, पुरी, मटार पॅटीस, मिरची पकोडा, थालीपीठ, आलू पराठा आणि विविध प्रकारचे पराठे यासारख्या लोकप्रिय पदार्थांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल, खर्चाचे नियोजन, योग्य जागेची निवड, शासनाच्या कर्ज व अनुदान योजना, ग्राहक वाढविण्याचे तंत्र आणि नफा वाढविण्याच्या रणनीती यावरही सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
जमीन गुंतवणूक व्यवसायाबाबत मार्गदर्शन
जमिनीचे भाव हे सर्वत्र आणि सतत वाढत असल्याने म्युच्युअल फंड, इक्विटी शेअर्स यांसारख्या गुंतवणुकीपेक्षा जमिनीतील गुंतवणूक जास्त फायद्याची ठरते. गुंतवणूक पर्याय म्हणून जमिनीकडे कसे बघावे व त्यातून पैसा कसा उभारावा यासंदर्भात मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २८ जूनला आयोजिली आहे. कार्यशाळेत जमिनीची मूलभूत माहिती: प्रकार, क्षेत्र आणि दस्तऐवजीकरण, स्पर्धक विश्लेषण आणि बाजार संशोधन, जमीन शोधणे व त्याचे नियोजन, बँकिंग आणि वित्त (निधी), विकास आणि विपणन, मालमत्ता व्यवस्थापन आदी विषयांवर रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत नोट्स दिल्या जातील, आणि १००% व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक उदाहरणांसह माहिती दिली जाईल.
हॉटेल, स्नॅक्स सेंटर व्यवस्थापन प्रशिक्षण
हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे आणि स्नॅक्स सेंटर व्यवसाय अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी तसेच नफा वाढविण्यासाठीचे व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण ३० जूनला आयोजिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित हे प्रशिक्षण उद्योजक, व्यवस्थापक आणि खाद्य व्यवसायाशी संबंधित व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणामध्ये कर्मचारी व्यवस्थापन, शेफ व सर्व्हिस स्टाफचे नियोजन, फूड आणि सर्व्हिस मॅनेजमेंट, ग्राहक सेवा आणि गुणवत्ता नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा सखोल आढावा घेतला जाईल. याशिवाय व्यवसाय विकास, विक्री वाढ, ग्राहक टिकवून ठेवण्याच्या रणनीती, ऑपरेशनल कार्यक्षमता आणि नफा वाढविण्याच्या प्रभावी पद्धती यावरही तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे. बदलत्या बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक व्यवस्थापन कौशल्ये विकसित करण्यावर या प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.