मुंबई

नगराध्यक्ष अतुल चौगुले यांचा शिवसेना शिंदेगटात प्रवेश

CD

नगराध्यक्ष चौगुले यांचा ठाकरे गटाला रामराम

श्रीवर्धन, ता. २३ (वार्ताहर) ः ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीवर्धन शहराला पक्षांतराचे ग्रहण लागले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर थेट मतदारांकडून विजयी झालेले नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला.
नगराध्यक्ष चौगुले श्रीवर्धनमधील लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला. आता निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला या भागात मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. ठाणे येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी चौगुले यांनी ‘धनुष्यबाण’ हाती घेतले.
आगामी काळात श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिंदे गटाचे वर्चस्व अधिक बळकट होण्याची चिन्हे यामुळे दिसत आहेत.
-----------------
डिसेंबर २०२५च्या नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदारांनी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन मला निवडून दिले. येथील जनतेच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता सत्तेची कास धरणे आवश्यक आहे. श्रीवर्धनच्या भ्रष्टाचारमुक्त विकासाकरिता मी आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करीत आहे. प्रवेश करताना माझी शिवसेना ठाकरे गटाबाबत कोणतीही नाराजी नाही. केवळ श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासाकरिता मी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करीत आहे.
- ॲड. अतुल चौगुले, नगराध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, आरोपीवर पोलिसांचा गोळीबार; झटापटीत पोलिस निरीक्षक जखमी

कर्नाटकात काँग्रेसचा रोज नवा खेळ, मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाची शक्यता; नाराजी दूर करण्यासाठी हालचाली

Nagpur Temple Theft Video : देवळात चोरी करण्यापूर्वी कान पकडून माफी मागितली; पण देवाने बरोबर केली शिक्षा पळून जाताना अपघात, नागपुरातील व्हिडिओ व्हायरल

AI Conversation : पावसाच्या आठवणींवर एआयशी गप्पा; संवादातून दिसली नवी झलक

Dharmendra Pradhan On Resignation जेन झींची दिशाभूल केली, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी सोडलं मौन; पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT