मुंबई

भोसरी जमीन घोटाळा प्रकरण

CD

खडसे कुटुंबीयांना अंतरिम दिलासा कायम
भोसरी जमीन घोटाळा प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार एकनाथ खडसेंसह कुटुंबीयांना दिलेला अंतरिम दिलासा उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २३) कायम ठेवला.
पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याच्या तपासांत खडसे कुटुंबीय सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्या. आश्विन भोबे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेऊन या प्रकरणातील स्थगिती हटवून याचिका गुणवत्तेच्या आधारावर सुनावणीस घेऊ, असा इशारा न्यायालयाने दिला. तरीही तूर्त सत्र न्यायालयाच्या विशेष एमपीएमएलए न्यायालयात सुरू असलेल्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला दिलेली अंतरिम स्थगिती न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवली.
महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतःसह पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरींवर आरोप निश्चित करण्यासाठी विशेष न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी याचिकेत केली आहे. मूळ प्रकरणाला दिलेले आव्हान प्रलंबित असून, त्यावर आधारित ईडीच्या ईसीआयआरमध्ये तूर्तास कारवाई करू नका, अशी खडसेंची याचिकेतील प्रमुख मागणी आहे. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात झालेल्या सुधारणेचा पूर्वलक्षी परिणामाचा मुद्दा मांडण्यासाठी अद्याप खंडपीठ गठित करण्यात आले नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT