मुंबई

तलासरीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

CD

तलासरीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
ऐतिहासिक वड तोडण्यास एकत्रित विरोध

तलासरी, ता. २३ (बातमीदार) : तलासरी नाका परिसरातील सुमारे १०० ते १५० वर्षे जुने ऐतिहासिक वडाचे झाड तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या झाडाखाली असलेल्या भगवान शंकर मंदिराचेही नुकसान झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, धार्मिक भावना दुखावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या मते, हे वडाचे झाड केवळ एक वृक्ष नव्हते, तर अनेक पिढ्यांच्या श्रद्धा, आठवणी आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक होते. पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या वृक्षाला विशेष महत्त्व होते. मात्र रस्ते विकासकामाच्या नावाखाली झाडाची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणात भाजप युवा मोर्चाचे तलासरी येथील चिटणीस तबरेज सकील कुरेशी यांनी पुढाकार घेत तलासरी नगर पंचायतीकडे निवेदन दिले आहे. धर्मापेक्षा मानवता, पर्यावरण संवर्धन आणि श्रद्धास्थानांचे संरक्षण महत्त्वाचे असल्याचा संदेश देत त्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

तबरेज कुरेशी यांनी निवेदनात म्हटले आहे, की तलासरी नाका परिसरातील जुना वडाचा वृक्ष आणि त्याखालील मंदिराचे झालेले नुकसान ही गंभीर बाब आहे. विकासकामांच्या नावाखाली श्रद्धास्थानांचे नुकसान होणे योग्य नाही. संबंधित जबाबदारांवर कारवाई करून मंदिराची पुनर्बांधणी करण्यात यावी तसेच विनाकारण होणारी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

शंकर मंदिर पूर्ववत उभारण्यात यावे, वडाच्या झाडाचे उर्वरित अस्तित्व जतन करण्यात यावे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे तलासरी परिसरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण समोर आले आहे. मुस्लिम समाजातील एका युवकाने हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतल्याने विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. सामाजिक सलोखा, धार्मिक सौहार्द आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या माध्यमातून अधोरेखित झाला आहे.

दरम्यान, रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीची भूमिका जाणून घेण्यासाठी कंपनीचे मुख्य अधिकारी गुलशन मीना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

याबाबत तलासरी नगर पंचायतीच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले, की नगरपंचायत हद्दीतील रस्त्यालगतची झाडे तोडण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यात आली होती. मात्र झाडे तोडण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया आणि त्यातील खबरदारीची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीची होती. झाडतोडीमुळे घर, मंदिर किंवा इतर मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेनंतर झाडतोडीच्या परवानगीतील अटींचे पालन झाले होते का, मंदिराचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली होती का आणि कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणांनी आपली जबाबदारी पार पाडली का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

विकासकामे आणि पर्यावरण तसेच ऐतिहासिक वारसा यामधील समतोल राखण्याची गरज या घटनेतून पुन्हा समोर आली आहे. नागरिकांनी निष्पक्ष चौकशी, दोषींवर कारवाई, मंदिराची पुनर्बांधणी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट नियमांची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

World Athletics U20 Championships: वर्ल्ड अंडर-२० ॲथ्लेटिक्समध्ये भारताचा डंका; आशिष यादवला रौप्य, तर शाहनवाज खानने जिंकले कांस्य पदक!

Shakeel Noorani: ३३ वर्षीय अभिनेत्रीला घरी बोलावून अत्याचार, ७३ वर्षांच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; सिनेसृष्टीत खळबळ

Marathi News Live Updates : पुण्यात सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडलं, घटना CCTVत कैद

Nashik Leopard News: बिबट्या पोहोचला शाळेच्या मैदानात, सीसीटीव्हीत कैद; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT