महावितरणच्या ५२ वीजग्राहकांचे समाधान
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) ः महावितरणच्या बदलापूर विभागाअंतर्गत येणाऱ्या सोनवली उपविभागातील ५२ वीजग्राहकांचे स्मार्ट मीटरसंदर्भातील तसेच वीज देयकासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी दिली.
बदलापूर विभागीय कार्यालयाशिवाय उपविभागीय कार्यालयात मागील दोन दिवसांपासून स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे निरसन करून त्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच काही वीजग्राहकांना वीज देयकासंदर्भात असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले, तर काही देयकांमध्ये दुरुस्ती करून देण्यात आली. बदलापूर शहर व परिसरातील ज्या वीजग्राहकांना वीज देयक अथवा स्मार्ट मीटरसंदर्भातील शंका असतील त्यांनी खरवई व सोनीवली उपविभागातील कार्यालयात भेट देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.