मुंबई

अर्धवट पुलाच्या कामामुळे पहिल्याच पावसात देहेनचा संपर्क तुटला

CD

अर्धवट पुलाच्या कामाचा फटका
पहिल्याच पावसात देहेन गावाचा संपर्क तुटला; ग्रामस्थांची कोंडी
पोयनाड, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यातील देहेन गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम पावसाळा सुरू झाले तरी अद्याप अपूर्णावस्थेत असल्याने पहिल्याच पावसात गावाला मोठा फटका बसला आहे. बुधवारी (ता. २४) पडलेल्या जोरदार पावसामुळे पाणी वाढले आणि देहेन गावाचा पांडवादेवी, भाकरवड व इतर परिसराशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
पांडवादेवी, भाकरवड येथून देहेनला जोडणारा पूल जुना आणि जीर्ण झाला होता. त्यामुळे या पुलावरून फक्त दुचाकी-चारचाकी वगळता अन्य अवजड वाहनांसाठी हा पूल बंद ठेवला होता. मे महिन्याच्या सुरुवातीला नवीन पुलाचे काम सुरू झाले होते. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम अतिशय संथगतीने सुरू होते. अशात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अर्धवट पुलाच्या कामामुळे येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. यामुळे गावाचा पांडवादेवी, भाकरवड संपर्क तुटल्याचे दिसून आले. या पुलाच्या कामामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता तरी शासनाने देहेन ग्रामस्थांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

पुराचा धोका गडद
या पुलाच्या कामासंदर्भात वारंवार शासनाला ग्रामस्थांनी निवेदन दिले होते; तरी या पुलाच्या कामाला गती आली नसल्याने देहेन गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे.


छायाचित्र :
पोयनाड : देहेन येथील पुलाच्या अर्धवट कामामुळे पहिल्याच पावसात पुरामुळे गावाचा संपर्क तुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Hot Showers For Hairwash: गरम पाण्याने केस धुणं चांगलं की वाईट? सेलिब्रिटी हेअरस्टाइलिस्टने सांगितलं खरं उत्तर

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT