मुंबई

माळशेज घाट मार्गावरील वाहतूक सुरळीत

CD

मुरबाड, ता. २४ (बातमीदार) : कल्याण-मुरबाड-माळशेज घाटमार्गे अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती टोकावडे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी दिली आहे. माळशेज घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद असल्याची अफवा समाजमाध्यमांवर पसरविली होती. मात्र, या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पहिल्या पावसानंतर घाट परिसरातील दरडींमधून काही छोटे दगड रस्त्यावर पडले होते. त्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. माळशेज घाट मार्गावरील वाहतूक नियमितपणे सुरू असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. तसेच कोणतीही माहिती अधिकृत स्रोतांकडूनच पडताळून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

‘गव्हर्नर माझ्यासाठी...’ मनोज बाजपेयींसोबतच्या अनुभवावर चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट; फोटो व्हायरल!

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

SCROLL FOR NEXT