मुंबई

विदेशी ''रामबुतान'' एपीएमसी बाजारात दाखल

CD

विदेशी ‘रामबुतान’ एपीएमसी बाजारात दाखल
मर्यादित काळासाठी फळ उपलब्ध; ३५० रुपये प्रतिकिलोने विक्री
बेलापूर, ता. २४ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरात पावसाचे आगमन होताच विविध देशी-विदेशी फळे वाशी येथील एपीएमसी बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये अवघ्या २० ते २२ दिवसांच्या मर्यादित काळासाठी ग्राहकांच्या भेटीला येणारे ‘रामबुतान’ हे विदेशी फळ सध्या बाजारात मुख्य आकर्षण ठरत आहे. लाल भडक रंग आणि केसांसारखे काटेरी आवरण यामुळे हे फळ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या काही वर्षांपासून थायलंड-मलेशिया-चीनवरून येत असलेल्या विदेशी फळांनी बाजारात लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. यापैकीच एक म्हणजे रामबुतान. लाल रंग, केसासारखे काटेरी आवरण या फळाला लक्षवेधी बनवते. हे फळ मूळचे मलेशियाचे आहे. रामबुतान म्हणजे केस. भारतात हे फळ थायलंडमधून मे ते सप्टेंबरमध्ये येते. हे फळ आतून अगदी लिचीप्रमाणे रसाळ व पांढरे दिसते. आतील गर थोडा आंबट-गोड लागतो. यात नैसर्गिकरीत्या अँटीबॅक्टीरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे शरीराला रोगांपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

आरोग्यवर्धक रामबुतान
हे एक औषधी फळ मानले जाते. लहान मुलामध्ये जंताची तक्रार असल्यास हे फळ गुणकारी आहे. या फळात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने अस्थिरोगात पेशींचे निकामी होणे तसेच सूज कमी करते. इतर कुठल्याही फळापेक्षा या फळात तांब्याचे प्रमाण जास्त असल्याने केस गळण्याचे प्रमाण कमी करण्यास, तसेच केसांचा रंग गर्द करण्यास व कमी वयातच केस पांढरे होण्याची तक्रार कमी करण्यास फायदेशीर ठरते. या फळातील फॉस्फरसमुळे, रात्री पायात गोळे येण्याचा त्रास असलेल्या वृद्धांसाठी हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

रामबुतान फळ सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे. मर्यादित दिवसांसाठी हे फळ असते. ३५० रुपये किलो असा या फळांचा भाव सुरू असून, लिचीएवढेच चवदार असते.
- मनीष मोरे, फळ व्यापारी, एपीएमसी

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Daund Municipal Outrage: दौंड नगरपालिकेत कंत्राटदार ‘गब्बर’कडून महिला अधिकार्याचा विनयभंग; सर्वांसमोर अश्लील हावभाव

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

SCROLL FOR NEXT