अलिबाग-पेण मार्गावर बॉयलर ट्रेलरमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः अलिबाग-पेण मार्गावर मंगळवारी (ता. २३) सकाळी बॉयलर वाहून नेणाऱ्या एका ट्रेलरमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. तिनविरा ते कार्लेखिंड यादरम्यान या वाहतुकीमुळे मार्गावर मोठा अडथळा निर्माण झाला होता. ऐन कामाच्या वेळी झालेल्या या कोंडीमुळे विद्यार्थी आणि नोकरदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
अलिबाग तालुक्याताल थळ येथील आरसीएफ कंपनीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील युरिया प्रकल्पाचे काम सुरू असून, त्यासाठी लागणारे अवजड साहित्य आणण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले तीन महाकाय बॉयलर ट्रेलरच्या सहाय्याने आणले जात आहेत. मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बॉयलर घेऊन जाणारे ट्रेलर तिनविरा मार्गे पुढे जात होते. मात्र, तिनविरा ते कार्लेखिंड हा मार्ग अरुंद असल्याने इतक्या मोठ्या आकाराच्या बॉयलरची वाहतूक करताना चालकांना मोठी कसरत करावी लागली. परिणामी, या मार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला आणि काही काळासाठी कोंडी निर्माण झाली. याचा विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांवर झाला.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळली. काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली असली तरी सकाळच्या गर्दीच्या वेळेत झालेल्या या अडथळ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.