मुंबई

आरटीआयवरील निर्बंधांविरोधात सजग नागरिक मंचाची हाक

CD

आरटीआयवरील निर्बंधांविरोधात सजग नागरिक मंचाची हाक
अण्णा हजारेंकडे हस्तक्षेपाची मागणी; नागरिकांवरील आर्थिक भाराचा मुद्दा ऐरणीवर
वाशी, ता. २४ (बातमीदार) : राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ मधील दुरुस्त्यांविरोधात सजग नागरिक मंच, नवी मुंबईने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. नव्या नियमांमुळे माहितीचा अधिकार अधिक खर्चिक आणि क्लिष्ट होणार असल्याची चिंता व्यक्त करत या लढ्यात हस्तक्षेप करण्याची विनंती मंचाने केली.
मंचाचे अध्यक्ष सुधीर दाणी यांनी अण्णा हजारे यांना भेटून सामान्य नागरिकांसाठी माहिती मिळविण्याचा मार्ग अधिक कठीण होण्याची भीती व्यक्त केली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून १३ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या दुरुस्त्या तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला.
अर्ज शुल्क, प्रति पृष्ठ शुल्क आणि अपील शुल्कातील वाढ सामान्य नागरिकांवर आर्थिक भार टाकणारी असल्याचा आक्षेप हजारे यांनी घेतला आहे. तसेच द्वितीय अपील प्रक्रियेतील नवीन अटी, तांत्रिक बंधने आणि सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास अपील बंद करण्याच्या तरतुदींवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. माहिती आयोगाने प्रत्येक प्रकरणाचा गुणदोषांच्या आधारे निर्णय घ्यावा, केवळ प्रक्रियात्मक कारणांमुळे नागरिकांचा न्यायाचा मार्ग बंद होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Hot Showers For Hairwash: गरम पाण्याने केस धुणं चांगलं की वाईट? सेलिब्रिटी हेअरस्टाइलिस्टने सांगितलं खरं उत्तर

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT