मुंबई

पावसाच्या दमदार हजेरीने दादर जलमय

CD

पावसाच्या दमदार हजेरीने दादर जलमय
प्रभादेवी, ता. २४ (बातमीदार) ः मुंबईत पावसाने दमदार पुनरागमन करत बुधवारी दादर परिसराला अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी मध्यरात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे दादर (पूर्व) परिसरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
दादर टीटी, हिंदू कॉलनी परिसर तसेच रेल्वे स्थानकाजवळील काही भागांत पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. जोरदार पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. कार्यालयीन वेळेत पाऊस कोसळल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली.
दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी परिसरात प्रत्येक वर्षी पाणी भरते, तर या भागात मोठी मोठी झाडे असल्याने अतिवृष्टी झाल्यावर ती पडण्याची भीती अधिक आहे या ठिकाणी अनेक शाळा असल्याने झाड पडून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे झाडांच्या फ़ांद्यांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणीदेखील स्थानिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे साचलेल्या पाण्यात चालण्याचा अंदाज येत नाही. शिवाय दुचाकीस्वारांनादेखील याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीदेखील होताना दिसून आली. महापालिकेच्या पथकांनी तातडीने नाले व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. दरम्यान, पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी साचलेल्या पाण्यामुळे दादरकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागांतील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT