मुंबई

शिरवणे सबवे पहिल्याच पावसात जलमय

CD

शिरवणे सबवे पहिल्याच पावसात जलमय
नागरिकांना वाहतूक करण्यात अडचण
बेलापूर, ता. २४ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पालिकेच्या मॉन्सूनपूर्व कामांची पोलखोल केली आहे. मंगळवार (ता. २३) दुपारपासून सुरू झालेल्या या पावसामुळे शिरवणे येथील सबवे (भुयारी मार्ग) पूर्णपणे जलमय झाला आहे. यामुळे खोल खड्ड्यांचा अंदाज येत नसून वाहनचालक व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सानपाडा, जुईनगर, शिरवणे परिसरात मोठ्या संख्येने लोकवस्ती असून, सानपाडा, शिरवणे या भुयारी मार्गाचा वापर करतात. परंतु, या भुयारी मार्गात मागील काही वर्षांपासून खड्डे आणि पाणी साचण्याचा घटना घडत आहेत. विशेष म्हणजे पाऊस नसतानाही या भागात पाणी साचत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, मध्यतंरी या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठी पालिकेने लाखांहून अधिक खर्च केला होता. मात्र, पाणी साचण्याची समस्या दूर झालेली नाही. अशातच शहरात सुरू असणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा शिरवणे सबवे जलमय झाला असून खड्डे देखील मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी, या साचलेल्या पाण्यातून, खड्ड्यातून नागरिकांना, वाहनांना मार्ग काढावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT